पूर्वपरिक्षणाची कार्यपध्दती
- अर्जदाराने मंडळाच्या कार्यालयातून नमुना “ आय फार्म” ( अर्जाचा छापील नमुना) प्राप्त करुन त्यातील संपूर्ण तपशील भरुन व अर्जाला रुपये 2 चा न्यायालयीन शुल्क मुद्रांक (कोर्ट फी स्टॅम्प) लावून तो अर्ज लिखाणाच्या दोन प्रतीसह या कार्यालयाकडे टपालाने/स्वत: सादर करता येईल. सदर अर्जाचा नमुना ( आय फॉर्म) मंडळाच्या mumbairangbhumi@gmail.com या Email Site वर ही संपर्क साधून प्राप्त करता येईल.
- पूर्वपरिक्षणाचा अर्ज www.aaplesarkar.mahaonline.gov.in या संकेत स्थळावरुन Online पध्दतीने ही सादर करता येतो.
- पूर्वपरिक्षणासाठी करावयाचा अर्ज (I FORM) रंगभूमी मंडळाच्या वेबसाईट वरील Related Links वर डाउनलोड येथे PDF स्वरुपात उपलब्ध आहे.
- लिखाणाच्या २ प्रती (copies) स्पष्ट व सुवाच्च अक्षरात कागदाच्या एकाच बाजूला लिहिलेल्या अथवा टंकलिखित केलेल्या आणि व्यवस्थित आवरण घातलेल्या असणे आवश्यक आहे.
- पूर्वपरिक्षण शुल्क केवळ रोखीने अथवा मनिऑर्डरने स्वीकारले जाईल. ते चलन/चेक/ पोस्टल ऑर्डर किंवा इतर पध्दतीने स्वीकारले जात नाही.
- अर्ज प्रत्यक्ष सादर करताना कार्यालयीन वेळेत दुपारी 5.00 पर्यंत पूर्वपरीक्षण शुल्क सह स्वीकारला जाईल.
- सर्व आवश्यक बाबीची पूर्तता झाल्याखेरीज परिक्षणाबाबत पुढील कार्यवाही केली जाणार नाही.